Maharashtra Congress Special Report : काँग्रेसला हवं झुकतं माप, मविआत वाढणार ताप? ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचणार आहे. महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत येणार असल्याची चिन्हे आहेत. शिवाय, लोकसभेच्या या निकालामुळे विधानसभेला महाविकास आघाडीतील गणिते बदलणार असणार असल्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच या यशाचे श्रेय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे असल्याचे बोलले जात आहे. आज त्यांच्या वाढदिवस असून काँग्रेसमध्ये दुहेरी आनंदोत्सव केला जात आहे. अशातच आज नाना पटोले यांचे राज्यात ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकले आहे.