Pune Crime News : पुणे हादरलं! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार : ABP Majha

Pune Crime News: राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमधे बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. यातील पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी (Pune Crime) आणि महिलांवरील अत्याचारांचा घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे.

फलटणला निघालेल्या तरुणीवर स्वारगेट बस डेपोत अत्याचार

घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे. दरम्यान आज ( 26 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास  पुण्यातील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडलीय. गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असुन त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन बसमध्ये अत्याचार

पुढे आलेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव असून तो अद्याप फरार आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं. तर 24 तास येथून बसेस जात असतात. दरम्यान, बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे. स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola