M. Venkaiah Naidu : राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ अन् सभापती वेंकय्या नायडू झाले भावूक...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2021 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेत काल झालेल्या विरोधकांच्या गोंधळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांना अश्रू अनावर झाले. कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान काल विरोधकांनी गोंधळ घातला. काळे कपडे, काळ्या फिती लावून सभागृहात आलेल्या विरोधकांनी जय जवान, जय किसानच्या घोषणा दिल्या. सभापतींच्या आसनावर रुल बुक भिरकावण्या आली. विरोधकांच्या या वर्तणुकीमुळे सभापती व्यथित झाले. काही विरोधी सदस्यांमुळे सभागृहाची प्रतिमा मलीन होत असल्याचे नायडूंनी म्हटलंय. कुठल्याही गोष्टीसाठी विरोधक सरकारवर जबरदस्ती करु शकत नाहीत असं नायडू यांनी सांगितलं. विरोधकांच्या गोंधळामुळे रात्रभर झोपू शकलो नाही असंही नायडूंनी म्हटलंय. यावेळी पुन्हा एकदा विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.