Online Exam मध्ये कॉपी करण्याचे धडे? ऑनलाईन शिक्षणातही चीटिंग! स्पेशल रिपोर्ट
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 23 Jun 2021 10:05 PM (IST)
कोरोना संक्रमणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होत असताना आता त्या ऑनलाईन परीक्षेत कॉपी करण्याचे धडे ही ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. "द व्हिलेजर" आणि अशाच विविध टोपण नावाने काही व्हिडीओ युट्युब आणि इतर सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर वायरल होत आहेत. ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत कॉपी कशी करावी याचे मार्गच विद्यार्थ्यांना सुचवण्यात आले आहे. या वायरल व्हिडीओची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून त्यासंदर्भात नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.