Lesbian Couple Engagement Nagpur : प्रेमाचं अनोखं बंधन... नागपूरमध्ये दोन तरुणींचा साखरपुडा
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
05 Jan 2022 12:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामाजिक बंधन झुगारून नागपुरात एक आगळावेगळा रिंग कमिटमेंट सेरेमनी अर्थात साक्षगंध पार पडला. एकत्र संसार करायचा निश्चय केलेल्या दोन मैत्रिणींनी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात हा सोहळा आयोजित केला होता. नागपुरात डॉक्टर सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी या दोघींची ही गोष्ट आहे. लवकरच त्या सिविल सेरेमनी म्हणजेच लग्नही करणार आहेत. एकमेकींच्या प्रेमाचा स्वीकार करून ते वास्तव इतरांनाही स्वीकारायला लावणाऱ्या, आणि पुढे कायद्याचं आव्हान स्वीकारायची हिंमत दाखवणाऱ्या या दोन उच्चशिक्षित मुलींनी नवं आयुष्य सुरु करायचं ठरवलं आहे.