Lakhimpur Kheri Violence : हिट अँड 'रण', विरोधक आक्रमक; शरद पवार, संजय राऊत यांनी केंद्राला सुनावलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले होते. यामध्ये आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक SUV गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसते आणि त्यांना तशीच चिरडत पुढे निघून जाते असं दिसतंय. हा व्हिडीओ लखीमपूर खेरी या ठिकाणचा असल्याचं सांगण्यात येतंय.
जवळपास 25 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलक शेतकरी सरकार विरोधी घोषणाबाजी करत रस्त्यावरून चालले आहेत आणि मागून अचानक एक SUV कार येते आणि त्यांना चिरडून तशीच पुढे निघून जाते. पण हा व्हिडीओ लखीमपूरमधील आहे की नाही याची सत्यता उत्तर प्रदेश पोलिसांनी अद्याप तपासली नाही.
ही SUV केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील होती. या SUV मध्ये मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच बसला होता असं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलंय.
तसेच शेतकरी हल्ल्याच्या घटनेची तुलना शरद पवारांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. आज लखीमपूर हिंसाचारप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार दोन्हींवर निशाणा साधला.