Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

Continues below advertisement

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

 महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत माझं फोनवर बोलणं झालं असून महायुतीचे केंद्रातील हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदासाठी जे नाव सुचवतील त्या नावाला माझा व शिवसेना पक्षाचा पाठिंबा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. त्यामुळे, मुख्यमंत्री आता भाजपचाच होईल, असे दिसून येत आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संख्याबळावर भाष्य करत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे म्हटले. तसेच, अजित दादांना Ajit pawar) मुख्यमंत्री करा, असं म्हणणाऱ्या रोहित पवारांना (Rohit Pawar) टोलाही लगावला. राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, महाराष्ट्राने  आजपर्यंत कधीच असा निकाल दिला नव्हता. काँग्रेसचा विक्रम मोडला गेला, त्याबद्दल सर्वांचे आभार. आता, आमच्यावर जबाबदारी वाढल्याचं अजित पवारांनी म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram