Ladki Bahin Yojana : लाडकी कोण? सासू की सून? लाडकी बहीण योजनेवरुन महाभारत Special Report
abp majha web team | 12 Aug 2025 11:14 PM (IST)
लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) आता अनेक घरांमध्ये वाद सुरू झाले आहेत. सरकारने एका घरातून केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नियम लागू केला आहे. यामुळे सासू आणि सून यांच्यात कोणाचे नाव योजनेतून काढायचे यावरून संघर्ष निर्माण झाला आहे. सुरुवातीला पुरुषांनीही फॉर्म भरून २७ कोटी रुपये लाटले होते, त्यानंतर चौकशी लावून हा नवीन नियम आणला गेला. अंगणवाडी सेविकांकडून (Anganwadi Sevika) सध्या या योजनेचे सर्वेक्षण केले जात आहे, मात्र त्यांना पडताळणीपेक्षा भांडणे सोडवण्यातच अधिक वेळ लागत आहे. एका अंगणवाडी सेविकेने सांगितले की, "ऐ बाई राशनकार्ड आम्ही तुला कसं देणार? आपला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिलाय. तू कोण? आमचं नाव कपात करून आम्ही तुला देणार नाही चाललं जाईल तू नाहीतर." छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात ८० हजारांहून अधिक घरांमध्ये तीन किंवा त्याहून अधिक लाभार्थी महिला आहेत. तसेच, २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या २० हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद ठरवले गेले आहेत. रेशन कार्ड (Ration Card) हा मुख्य निकष असल्याने लग्न झालेल्या मुलीने लाभ घ्यायचा की सुनेने, यावरूनही वाद आहेत. आता घरातली 'लाडकी' कोण हे ठरवण्याचा अधिकार घरातील कर्त्या पुरुषाला देण्यात आला आहे.