Independence Day 2021 : अमृत भारत...अभिमान भारत! स्वातंत्र्योत्तर भारताचा गौरवशाली प्रवास ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2021 04:29 PM (IST)
Independence Day : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतासाठी एकदम खासच. आज भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. याच दिवशी ब्रिटिशांच्या जवळपास 150 वर्षांच्या गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि नागरिकांनी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक ज्ञात आणि अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मध्यरात्री घड्याळात 12 च्या ठोका वाजला आणि भारत स्वातंत्र्य झाला. पण भारतीय स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? हा दिवस निवडण्यामागे काही ऐतिहासिक कारण होतं का? आपण याच दिवशी स्वातंत्र्याचा जल्लोश साजरा का करतो त्यामागचे कारण जाणून घेऊया.