कोरोना, लॉकडाऊनमुळे Hyatt Regency पंचतारांकित हॉटेल तात्पुरतं बंद,200 कर्मचाऱ्यांचं पुढे काय होणार?
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
09 Jun 2021 12:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्थिक चणचण निर्माण झाल्याने मुंबईतील प्रसिद्ध अशा हयात रेजन्सी या पंचतारांकित हॉटेलने आपला कारभार काही काळासाठी बंद केला आहे. देशाची आर्थिक राजधानीच्या शहरात असणाऱ्या या हॉटेलने आपला सर्व कारभार तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचं सोमवारी रात्री एक पत्रक काढून जाहीर केलंय. तशा सूचना सुद्धा कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आर्थिक संकटामुळे आणि पुरेसा फ़ंड उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं हॉटेलची मालकी असणाऱ्या कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र, यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामच बंद झाल्याने पुढे नेमकं आता काय करायचं हा प्रश्न पडला आहे .