Ravindra Waikar Jogeshwari Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद
Ravindra Waikar Jogeshwari Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद
गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगरदंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला त्यामुळे, वायकर यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद करून आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद