Taj Mahal : पत्नीला भेट देण्यासाठी पतीने बांधला चक्क 'ताजमहल', बुऱ्हाणपुरातील शिक्षकाचे अनोखे प्रेम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा : शाहजहान व मुमताज ची प्रेमकहाणी सर्वश्रुत आहेत. मुमताजसाठी शाहजहान ने ताजमहाल बांधला. पण आजच्या युगातील शाहजहानने आपल्या पत्नीला गिफ्ट देण्यासाठी चक्क ताजमहलसारखं दिसणारं घरच बनवलं आहे. शिक्षकी पेशात असणाऱ्या या आजच्या शाहजहानने हुबेहूब ताजमहल सारखं दिसणारं घर आपल्या पत्नीला गिफ्ट दिल आहे. बुऱ्हाणपूर येथील पेशाने शिक्षक असलेले आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांची पत्नी मंजूषासाठी हे घर बाधलंय. आनंद प्रकाश चौकसे अस या शिक्षकाचं नाव असून आपली पत्नी मंजुषा चौकसे हिला हे घर भेट दिल आहे. या हुबेहूब ताजमहल सारख्या घराला चारमिनार, चार बेडरूम्स, एक किचन, लायब्ररी, मेडिटेशन रुम असून हे घर बांधायला अनेक राज्यातील कारागिरांची मदत घेण्यात आली आहे. हे घर बांधायला आनंदप्रकाश यांना तीन वर्षे लागली आहेत. आपल्या पत्नीवरील प्रेमापोटी आनंद प्रकाश यांनी हे घर बांधलं आहे. आता या घराची चर्चा देश-विदेशात होत आहे. आनंदप्रकाश हे शिक्षक असून त्यांचं मॅक्रो व्हिजन अकॅडमी नावाने बुऱ्हाणपूर येथे फाईव्ह स्टार निवासी विद्यालय आहे. ते स्वतःला सध्याही शिक्षकच म्हणवून घेतात.