Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP Majha 

काँग्रेसने (Congress) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar  ) वारंवार अपमान केला. नेहरूंपासून आतापर्यंतच्या कांग्रेस नेतृत्वाने बाबासाहेबांचा वारंवार अपमान केलाय. त्यांचं योगदान काँग्रेसने नाकारलंय. काँग्रेसचे लोक बाबासाहेबांचा अपमान करतात, त्यांची संविधान निर्माता ही ओळख काँग्रेसला खुपते, कारण ते दलित मातेचे सुपूत्र होते.  मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्यासाठी सदा-सर्वदा पूजनीय आहेत आणि राहतील. आम्ही देशभरात त्यांची स्मारकं उभारली. मी अकोल्यातून काँग्रेसच्या शाही परिवाराला आव्हान देतो की त्यांनी बाबासाहेबांच्या पंचतिर्थाला वंदन केलं हे सिद्ध करावं. असे थेट आव्हान देत अकोल्याच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.   काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल- नरेंद्र मोदी काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल. काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसींची प्रगती पाहू शकत नाही. कांग्रेस दलितांमधील जातीजातीत भांडणं लावत आहे आणि हिच चाल आणि चरित्र काँग्रेसचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.'एक है तो,सेफ है असे म्हणत हरियाणात काँग्रेसचे मनसुबे उधळून लावलेत. जम्मू काश्मीर विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram