Drugs Seized : Gujarat मध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तब्बल 350 कोटींचं ड्रग्ज पोलिसांच्या ताब्यात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे ड्रग्जवरुन गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण गाजतंय. ड्रग्जच्या नावाखाली महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय. अशातच गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय.. द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. ज्यात हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्जची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी गुजरात पोलिसांनी सज्जाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई कारा या तिघांना अटक केली आहे. त्यातील सज्जाद हा ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. यापूर्वी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.