Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतम अदानी (Gautam Adani) यांच्या उद्योगसमुहातील कंपन्या ज्या संस्थेच्या अहवालामुळं अडचणीत आल्या होत्या ती संस्था हिंडेनबर्ग रिसर्चनं (Hindenburg Research) त्यांचं कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. नेट अँडरसननं सोशल मीडियावर पोस्ट करुन हिंडेनबर्ग रिसर्च बंद करत असल्याची घोषणा केली. त्यामुळं आज शेअर बाजार सुरु झाला तेव्हा अदानी उद्योग समुहाच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली.
अदानी ग्रुपच्या शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कंपन्यांपैकी अदानी पॉवरचा स्टॉक 7.8 टक्क्यांनी वाढला. अदानी ग्रीन एनर्जीचा स्टॉक 7.8 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी सोल्यूशन्स 5.18 टक्क्यांनी वाढला. एसीसी सिमेंट 3.47 टक्क्यांनी तर, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 5.78 टक्क्यांनी वाढले. अदानी पोर्टस अँड एसईझेड 4.29 टक्के, अदानी टोटल गॅस 5.21 टक्क्यांनी वाढले. अंबुजा सिमेंटचा शेअर 4.01 टक्क्यांनी वाढले. संघी इंडस्ट्रीजचे शेअर 2.92 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे अदानी विल्मरचे घसरले आहेत.
हिंडेनबर्ग रिसर्चनं जानेवारी 2023 मध्ये अदानी ग्रुप विरोधात एक रिपोर्ट जारी करुन बाजारात फेरफार आणि अकाऊंटिंग घोटाळ्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे स्टॉक्स कोसळले होते. अदानी ग्रुपचं मार्केट कॅपिटलायझेशन 20 लाख कोटींवरुन 7.50 लाख कोटींपर्यंत आलं होतं.