Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ Maharashtra Congress President , नाना पटोलेंना डच्चू

Harshvardhan Sapkal : काँग्रेसच्या (Congress) गोटातून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले होते. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद हे हर्षवर्धन सपकाळ यांना गेले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. तसेच गांधी परिवाराचे अत्यंत जवळचे सहकारी ते मानले जातात. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्य पदाच्या शर्यतीत अनेक नावे होती. यामध्ये कोल्हापूरचे सतेज पाटील, लातूरचे अमित देशमुख, सांगलीचे विश्वजित कदम यांची नावे देखील होती. मात्र, अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्याच गळ्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola