सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'कास पठार', वेंगुर्ल्यातील म्हापण गावात रंगीबेरंगी रानफुलांनी बगरलेले डोंगर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2020 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गातील कास पठार वेंगुर्लेतील म्हापण गावातील माळरानावर अवतरलंय पृथ्वीवरच स्वर्ग. याठिकाणची ४० ते ४५ प्रकारची रानफुले निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. म्हापणच्या माळरानावरील प्रति कास पठार रानफुलांनी बहरून गेलं आहे. याठिकाणी अनेक प्रजातीच्या विविधरंगी फुलांचा निसर्गाचा अद्भुत असा अविष्कार राज्याच्या देवभूमीवर पाहायला मिळतं आहे. कोकण नेहमीच सौदर्य श्रुष्टीतीने नटलेला भूभाग असून पर्यटक कोकणाच्या निसर्गाच्या प्रेमात नेहमीच पडतात. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील जैवविविधता, पठारावरील रानफुले, स्वच्छ सुंदर समुद्र किनारे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू नेहमीच असतं.