Heat Wave : रायगडात सर्वाधिक तापमानाची नोंद, मुंबईत 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर
abp majha web team
Updated at:
15 Mar 2022 10:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHeat Wave : उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय. कारण कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेलंय. रायगडच्या कर्जतमध्ये सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर परभणीत आज 38.02 अंश सेल्सिअस आणि वाशिममध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मुंबईमध्ये 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर गेला आहे.