#Corona सकस आहार हेच निरोगी जीवनाचं सूत्र, सरकारकडून कोरोना काळासाठी Diet Plan जारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2021 11:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप आटोक्यात आलेली नसताना तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या घातक संसर्गाशी दोन हात करण्यासाठी विषाणूची साखळी तोडणं गरजेचं बनलं आहे. सोबत रुग्ण लवकर बरे होण्याचं प्रमाण वाढलं तर ती दिलासादायक बाब असेल. त्यासाठी भारत सरकारने गृह विलगीकरणात बरे होणाऱ्या रुग्णांसाठी नवा डाएट प्लॅन शेअर केला आहे. या डाएट प्लॅनमुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढून बरं होण्यास मदत होईल. डार्क चॉकलेट, खिचडी, मासे, पनीरचा आहारात नियमित समावेश केल्यास रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.