Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे गेल्यानंतर जून महिन्यामध्ये सादर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षरशः वरदान ठरली. या एका योजनेच्या जोरावर महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये येण्यास संधी मिळाली. महायुतीला राज्यातील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान देत भक्कम बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे आता महायुतीने सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला निर्णय या लाडकी बहीण योजने संदर्भात घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुतीकडून धडाधड निर्णय घेण्यात आले. अनेक शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आले होते. मात्र, या सर्वांमध्ये महत्त्वाचा घटक लाडकी बहीण योजना होता. या योजनेचे आगाऊ पैसे देण्यात आल्याने मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला होता.