Gokul Rada : गोकुळ डिबेंचर वाद चिघळला, दूध बंद आंदोलनाचा इशारा Special Report
abp majha web team | 16 Oct 2025 10:26 PM (IST)
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील (Gokul Milk Union) कर्जरोखे अर्थात डिबेंचर कपातीवरून (Debenture Cut) राजकारण तापले आहे. संचालक शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांनी मोर्चा काढल्याने सत्ताधारी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि सतेज पाटील (Satej Patil) गटाची कोंडी झाली आहे. दूध उत्पादकांनी 'जर गोकुळ दूध संघानं डिबेंचर पोटी घेतलेलं पैसे परत नाही केले तर मात्र याच्यापेक्षा मोठा मोर्चा किंवा दूध बंद आंदोलन आम्ही करणार आहोत,' असा थेट इशारा दिला आहे. दरवर्षी १०-१५ टक्के होणारी कपात यंदा ४० टक्क्यांवर गेल्याचा आरोप करत, संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. संचालक मंडळाने उद्यापर्यंत सकारात्मक निर्णय घेऊन 'गोड बातमी' देण्याचे आश्वासन दिले असले, तरी या प्रकरणामुळे महायुतीमध्येच अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.