Goa :गोंयकरांचे 'भाई'... Manohar Parrikar ;कसं होतं गोव्याच्या राजकारणातलं मनोहर पर्व?Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही पाहताय पाच राज्यांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आमचा खास कार्यक्रम कोण होणार मुख्यमंत्री? देशातल्या पाच राज्यांमध्ये येत्या काही दिवसात निवडणुका होणार आहेत. त्यापैकी एक आहे गोवा. गोवा आणि गोव्यातलं राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचं. मनोहर पर्रिकर यांच्याशिवाय गोवा भाजपचा गेल्या तीन दशकातील वाटचालीचा इतिहास पूर्णच होणार नाही.मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात भाजप पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरं जातंय. पण पर्रिकरांनी गोव्यात पक्ष कसा वाढवला? त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती? आणि महत्वाचं म्हणजे समस्त गोवेकरांना मनोहर पर्रिकर उर्फ 'भाई' आपलेसे का वाटतात? या साऱ्यांचा आढावा घेऊयात गोंयकरांचे 'भाई' या रिपोर्टमधून..