Ghatkopar Hoarding Collapse Special Report : होर्डिंग कोसळलं, माणसं दबली, कुटुंबांचा आधार हरपला
सुधीर काकडे
Updated at:
15 May 2024 06:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGhatkopar Hoarding Collapse Special Report : होर्डिंग कोसळलं, माणसं दबली, कुटुंबांचा आधार हरपला
सोमवारी दुपारी पावसाचे ढग जणू काही मृत्यूच घेऊन आले होते. पावसाने मुंबईची दाणादाण उडाली होती. कुठे पाऊस, कुठे वारा, कुठे धुळीचं वादळ, सारं काही हादरवणारं घडत होतं. 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या धुळीच्या वादळाचा मोठा तडाखा बसला. घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर जणू मृत्यूच कोसळला. सोसाट्याच्या वाऱ्याने छेडानगर परिसात पट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं अन् 14 जण जागीच ठार झाले. या घटनेनं फक्त 14 जणांचा जीवच गेला नाही तर 14 कुटुंब हादरून गेलेत.