Naxal Gadchiroli : आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा Special Report
नक्षल चळवळीत सहभागी होताना महिला असेल किंवा पुरुष सदस्य सर्वात आधी त्यांची नसबंदी केली जाते. मात्र एक दाम्पत्य नशीबवान ठरलं. मुख्य कमांडरचा बॉडीगार्ड असल्याचा फायदा घेत त्यांनी नियम झुगारले.चळवळीत राहून एका मुलाला आणि आता आत्मसमर्पणानंतर दुसऱ्या मुलाला त्यांनी जन्म दिलाय. बघुयात हा स्पेशल रिपोर्ट....
आत्मसमर्पित नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा
पुत्ररत्न प्राप्तीने नक्षल दांपत्याच्या जीवनात नवी पहाट
चळवळीत राहून दिला होता नसबंदीला स्पष्ट नकार
Z:2211GadchiroliNAXAL BABAY BOY
VO
हा निष्पाप निरागस चेहरा
हे चिमुकले गोंडस बाळ
आपल्या आईच्या कुशीत अतिशय विश्वासाने विसावलंय.
मायलेकाचं हे दृश्य दिसतं तेवढं साधं नाहीय,
त्याचं या जगात येणं वाटतं तेवढं सोपं नाहीय
कारण हे नवजात बाळ आहे
आत्मसमर्पण केलेल्या नक्षली दाम्पत्याचं
अर्जुन उर्फ सागर हिचामी आणि त्याची पत्नी सम्मी उर्फ बंडी मट्टामी असे या नक्षल दांपत्याची नावं आहेत.
1 जानेवारी 2025 रोजी नक्षलनेता तारक्कासोबत त्यांनी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं.
या एका निर्णयामुळे त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली
BITE- अर्जुन उर्फ सागर हिचामी, आत्मसमर्पित नक्षल
GFX IN
अर्जुन हा केंद्रीय समितीचा सचिव सोनू उर्फ भूपती याचा अंगरक्षक म्हणून काम करायचा.
तर सम्मी ही नक्षलवाद्यांच्या डॉक्टर टीम मध्ये होती.
दोघांनीही २०१७ साली लग्न केलं.
तेव्हा नक्षलींच्या प्रथेप्रमाणे नक्षल नेता भूपतीने अर्जुनला नसबंदी करण्यासंदर्भात वारंवार बजावले.
मात्र अर्जुनने त्याला स्पष्ट नकार देत नसबंदी करणं टाळलं होतं
GFX OUT
VO
अर्जुन हा 2010 मध्ये नक्षल चळवळीत सहभागी झाला होता. 2017 मध्ये लग्न केल्यानंतर आत्मसर्पण करण्याचे विचार त्याच्या मनात येऊ लागले.
आत्मसमर्पण करता आले नाही मात्र नसबंदी न केल्यामुळे नोव्हेंबर 2017 मध्ये त्याच्या पत्नीने जंगलामध्येच एका मुलाला जन्म दिला.
तीन वर्ष मुलाला सोबत घेऊन जंगलामध्ये फिरत असतानाच अर्जुनला मुलाच्या भविष्याची चिंता सतावत होती.
त्यामुळे मुलाला आजी आजोबांकडे छत्तीसगड मधील बेरेलटोला या गावात ठेवून तो चळवळीत सक्रिय राहिला.
BITE- अर्जुन उर्फ सागर हिचामी, आत्मसमर्पित नक्षल
VO
आत्मसमर्पण केल्यानंतर शासनाकडून विविध योजनांचा लाभ आता मिळत आहे.
मोठा मुलगा हेमलकसा इथल्या 'लोक बिरादरी' प्रकल्पात दुसरीत शिकतोय.
आता दुसऱ्या मुलाचा जन्म झाल्याने कुटुंब पूर्ण झाल्याचे अर्जुन सांगतो.
त्यांचे नातेवाईकही आनंदी आहेत.
BITE- दसरी पदा, आत्या
PTC : मंगेश भांडेकर, प्रतिनिधी गडचिरोली
VO
बंदूक खाली ठेवत आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला आणि या नक्षल दांपत्याच्या आयुष्यात असा गोड आणि सकारात्मक बदल झालाय.
जीवन सुंदर आहे फक्त हिंसेचा मार्ग वेळेत सोडता यायला हवा ही बाब इतर नक्षलवाद्यांना लक्षात येईल अशी आशा
मंगेश भांडेकर, एबीपी माझा गडचिरोली