Delhi Blast : जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान Special Report
दिल्ली ब्लास्ट प्रकरणी (Delhi Blast Case) NIA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. i 20 कार विकत घेणाऱ्या आमिर राशिद अलीला अटक करण्यात आली आहे. आमिर राशिद अलीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. आमिर अलीने हल्लेखोरासोबत कट आखला होता. आमिर राशिद अली हा जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी आहे. प्लंबर म्हणून तो काम करत होता.
आमिरने डॉ. उमरसोबत मिळून दिल्लीत दहशत माजवण्याचा धोकादायक कट रचला
दिल्ली लाल किल्ला स्फोटात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. एनआयएने आय20 कारचा मालक आमिर रशीद याला अटक केली आहे. आमिरने डॉ. उमरसोबत मिळून दिल्लीत दहशत माजवण्याचा धोकादायक कट रचला होता. आमिर हा जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथील सांबुरा येथील रहिवासी आहे. आत्मघातकी हल्लेखोराने कारमध्ये स्फोट घडवण्यासाठी आयईडीचा वापर केला, ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आणि 32 जण जखमी झाले, असा महत्त्वपूर्ण खुलासा एनआयएने केला आहे.