Fuel Rates : तेलंगणा, कर्नाटक, गोव्यात इंधन दर कमी, महाराष्ट्रात Petrol Diesel कधी स्वस्त होणार?
abp majha web team
Updated at:
11 Nov 2021 09:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र सरकार पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करत नसल्यानं सीमेवरील नागरिक आता शेजारच्या राज्यांतील पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरू लागलेत. कारण पेट्रोल, डिझेलच्या किंमती केंद्रानं 5 आणि 10 रुपयांनी कमी केल्यानंतर काही राज्यांनीही कर कमी केले आणि त्यामुळे या राज्यांत दर आणखी कमी झालेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या 4 राज्यांनी कर कमी केल्यानंतर सीमेजवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन लोक पेट्रोल आणि डिझेल भरतायत. त्यामुळे सीमेजवळच्या पेट्रोल पंपावरील इंधनाची विक्री 50 टक्क्यांनी वाढलीय.