Farmers Protest : शेतकरी आंदोलनात गेल्या वर्षभरात काय झालं? जाणून घ्या आंदोलनातील महत्त्वाच्या घटना
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने तीन नवी कृषी कायदे पारित केले होते. त्या विरोधात गेल्या वर्षभरातपासून देशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरु केलं. त्यांच्यापुढं अखेर केंद्र सरकारने झुकती भूमिका घेत तीनही कायदे मागे घेतले.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता त्यांच्या घरी जावं, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा, एक नवी सुरुवात करावी असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. येत्या अधिवेशनामध्ये हे तीनही कायदे मागे घेण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.