Laxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

Continues below advertisement

Laxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

हे देखील वाचा

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडली आहे. मात्र, अद्यापही आरक्षण मिळालं नाही, त्यावरुनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारातील एका सभेत बोलताना मनोज जरांगे व मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईपर्यंत आले, गुलाल उधळला, आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली. पण, अद्यापही आरक्षण मिळालेलं नाही. मी अगोदरच सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तो विषय राज्य सरकारचा नाही, असे राज ठाकरेंनी म्हटलं होतं. यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) पलटवार केला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. 

राज ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, त्यांना काय पंचायत पडलीय हे मला कळना, त्यांना मानणारा वर्ग आहे आमचा. देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून राज ठाकरेंनी या लफड्यात पडण्याची गरज नाही. तुम्हाला सांगणं आहे, हे रागारागात नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका, यानंतर तुम्ही आरक्षण विषयावर बोलू नका, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. समाजाचं अस्तित्व कसे वाढवायचे हे  मला चांगले माहिती, तुमच्यासारखं मी अस्तित्व गमवणारा नाही. 57 लाख नोंदी, दोन कोरड मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. आमच्या भानगडीत न पडता समाजाची तुम्ही नाराजी घेऊ नये, इथून पुढे तुम्ही आरक्षणावर बोल नये एवढीच माझी अपेक्षा आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram