Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#SpecialReport रत्नागिरीत बहरली Dragon Fruit ची शेती,डॉ. श्रीराम फडकेंकडून रत्नागिरीत पहिलाच प्रयोग
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
19 Jun 2021 06:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appड्रॅगन फ्रुट आपणा सर्वांना माहीत आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यात ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचे प्रयोग यशस्वी देखील झाले आहेत. पण, आता मात्र आपण कोकणात यशस्वी ठरलेल्या ड्रॅगन फ्रुटची शेती पाहणार आहोत. लक्षणीय बाब म्हणजे किमान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरी हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे.
सर्वत्र जरी याला ड्रॅगन फ्रुट म्हणून ओळखलं जात असलं तरी थायलंडमध्ये याला 'पीटाया' म्हणतात. तर आपलं जवळचं राज्य असलेल्या गुजरातमध्ये त्याचं नामकरण 'कमलम' म्हणून केलं गेलंय. डेंग्युच्या आजारावर शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त म्हणून देखील या फळाला मोठी मागणी आहे आणि अशा या फळाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग कोकणाच्या काळ्या कातळावर झालाय.