Donald Trump threatens Apple | भारतात आयफोन बनवाल तर याद राखा, ट्रम्प यांचं भारताविरोधी धोरण का?
दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगासोबतच व्यापारयुद्ध पुकारलंय...सर्वाधिक टॅक्स आकारणारा देश म्हणून भारतावर ते वारंवार टीका करतायत. भारतात येणारी गुंतवणूकही रोखण्यासाठी आता कते सरसावलेत...भारतात अॅपलचं प्रोडक्शन नको, अशी सूचना केल्यानंतर आता ट्रप्म यांनी अॅपलला नवी धमकी दिलीय...पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
काहीच दिवसांपूर्वी विविध देशांना टॅरिफचा दणका देणाऱ्या ट्रम्प यांनी आता आयफोनला धमकी दिलीये. आयफोनने अमेरिकेबाहेरील उत्पादन थांबवावं अशी धमकी ट्रम्प यांनी टीम कूक यांना दिलीये. जर अॅपलने अमेरिकेत आयफोन तयार केले नाहीत तर २५ टक्के अधिकचा कर लावला जाईल अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिलीये. सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी अॅपलला हा इशारा दिलाय.
पण आता भारतात पसरणारं आयफोननिर्मितीचं जाळं ट्रम्प यांना मान्य नाहीये आपला मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणा देत ट्रम्प यांनी जगालाच आर्थिक धक्का देण्याचे प्रयत्न सुरू केलेत... भारत-पाकिस्तानातल्या युद्धाला आपल्यामुळेच पूर्णविराम लागल्याचं ट्रम्प वारंवार सांगतायत... एकीकडे भारताला मित्र म्हणणाऱ्या ट्रम्प यांचं सध्याचं धोऱण मात्र भारताच्या विरोधातलं दिसतंय...