Dombivli MIDC Boiler Blast : डोंबिवली स्फोट, अश्रूंचा पूर, आरोपांचा धूर Special Report
अक्षय भाटकर, एबीपी माझा Updated at: 24 May 2024 11:54 PM (IST)
डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत स्फोट झाला आणि ११ आयुष्य या आगीने गिळंकृत केली. अनेकांची आपली माणसं या स्फोटाने कायमची हिरावून घेतली. अनेक घरातले कर्ते-सवरते गेल्याने या कुटुंबाच्या स्वप्नांची राख झाली. तर, शासन पातळीवर तातडीने कारवाईची पावलं पडू लागली. आरोप-प्रत्यारोप झाले. पाहूयात सविस्तर रिपोर्ट..
डोंबिवलीच्या अमुदान कंपनीत स्फोट झाला
आणि स्थानिकांच्या तसेच मृतांच्या
नातेवाईकांच्या नशिबी अश्रू आणि संताप
एकवटलाय. ज्यांच्या घरातील माणूस इथं
काम करत होतं, ते अजून सापडलंच
नसल्याने त्यांच्या भवतालात पोकळी
निर्माण झालीय आणि उरलीय फक्त वेदना...
एकीकडे डोंबिवलीतील स्फोटामुळे
मुंबापुरी हादरली असताना, दुसरीकडे
अमुदान कंपनीच्या मालकीन मालती मेहता
यांना अटक करण्यात आलीय. आणि
कंपनीशी संबंधित लोकांवर सदोष
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात