Dheeraj Deshmukh Controversy Special Report : बेळगावातील 'त्या' घोषणेमुळे धीरज देशमुख वादात
abp majha web team | 07 Mar 2023 12:03 AM (IST)
बेळगाव: एकीकडे गेल्या 65 वर्षापासून बेळगावातील मराठी भाषिक (Maharashtra-Karnataka Dispute) महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत असताना, त्यांना महाराष्ट्रातून हवा तेवढा राजकीय पाठिंबा मिळत नसल्याचं वास्तव आहे. पाठिंब्याचं राहू दे, पण महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता किमान मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नये अशा प्रतिक्रिया आता सीमाभागातून व्यक्त केल्या जात आहेत. त्याला कारण म्हणजे लातूरचे आमदार धीरज देशमुखांचा (Dhiraj Deshmukh) नारा. बेळगावमध्ये एका कार्यक्रमाला गेल्यानंतर, भाषण संपल्यानंतर धीरज देशमुखांनी 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला.