भाजपच्या निशाण्यावर अजित पवार? लेटरबॉम्ब प्रकरणी अजितदादांची चौकशी करण्याची मागणी : स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2021 12:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : गेल्या काही दिवसांत भाजप आणि अजित पवार यांची जवळीक असल्याच्या राजकीय चर्चा होत आहेत. मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मांडला जाणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे.