Farmer Loss | अवकाळीने बळीराजाचं मोठं नुकसान, नाशिकमध्ये द्राक्षबागांना फटका, कांदा,मका,गव्हाचंही नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2021 09:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्रात कालपासून सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. आजही मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. त्यामुळं थंडीच्या मोसमात स्वेटर घालण्याऐवजी आता चक्क छत्री आणि रेनकोट घेऊन घराबाहेर पडावं लागत आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकणातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी मक्याचं पिक झोपलंय तर कांदा खराब झाला आहे.