Vaccination : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये लसीकरण केंद्रांवर गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2021 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यात आज 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
आजपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला 26 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये उद्या 2 मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 3 लाख डोसेस खरेदी केले आहेत.