Shivaji Park Crocodile Special Report : शिवाजी पार्कमधील स्विमिंग पूलमध्ये 'मगर' आली कुठून?
abp majha web team
Updated at:
03 Oct 2023 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या (Shivaji Park) महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool) सकाळी एक मगर आढळली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यादरम्यान मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा देखील घेतला. बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून मगर धरण तलावात आली असावी अशी शक्यता स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. याआधी देखील अजगर आणि साप याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.