South Africa Corona : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट, नव्या व्हेरियंटची WHO लाही धास्ती
abp majha web team
Updated at:
26 Nov 2021 11:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाची आकडेवारी घटल्यानंतर अनलॉकच्या टप्प्यात येऊन आता कुठे आपल्याकडे सगळे व्यवहार स्थिरस्थावर होतायत. थिएटर्स, नाट्यगृह खुली झाल्याने मनोरंजन क्षेत्राची गाडी रुळावर येतेय. शिवाय शाळाही सुरु करण्याचा निर्णय़ झालाय. हळूहळू सगळेच निर्बंध शिथील होतायत. संपूर्ण लॉकडाऊन असलेलं राज्य पूर्ण अनलॉकच्या मार्गावर आहे. आपण सारे आता कुठे मोकळा श्वास घेऊ लागलोय. मात्र हे समाधान औट घटकेचंच ठरणार का? हा प्रश्न विचारण्याचं कारण दक्षिण आफ्रिकेत एका नव्या व्हेरियंटने दिलेली वर्दी. ज्याची भीती डब्ल्यूएचओलादेखील वाटतेय. यामुळे जग पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने तर वाटचाल करत नाही ना, अशीही चर्चा सुरु झालीय.