Chhagan Bhujbal Statement Special Report : तेलगी घोटाळा आणि भुजबळांचं वक्तव्य, वादाचा नवा अंक
abp majha web team Updated at: 28 Aug 2023 10:51 PM (IST)
तेलगी घोटाळा... जो तब्बल ११ वर्षे बिनबोभाट सुरू होता... आणि आकडाही हलका नव्हता... तर तो होता तब्बल ३० हजार कोटींचा...खरंतर, घोटाळा उघड होऊनही आता २० वर्षे उलटली... त्यानंतर तेलगी तुरूंगात गेला... त्याचा मृत्यू होऊनही सहा वर्षे उलटलीयत... मात्र आता या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचे सांगाडे पुन्हा एकदा उकरून काढले जातायत... राजकारणासाठी... पाहूयात... तेलगीवरून भुजबळ ते पवार व्हाया राजीनामा... कसा सुरू झालाय वादाचा नवा अंक.