Ashish Shelar Vs MVA मतदारयादी घोळावरुन धार्मिक राजकारण,'दुबार मतदार',ठाकरे वि. शेलार Special Report
abp majha web team | 03 Nov 2025 09:58 PM (IST)
महाराष्ट्रात (Maharashtra) मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदारांवरून (Duplicate Voters) राजकारण तापले आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी 'वोट जिहाद'चा (Vote Jihad) आरोप करत ठाकरे बंधूंना (Thackeray Brothers) लक्ष्य केले आहे. 'धर्माच्या नावावर मतदार संघाच्या मांडणी करणं, मतदारांची मांडणी करणं हे पाप राज ठाकरे (Raj Thackeray) जी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जींनी केलेलं आहे,' असा थेट हल्लाबोल शेलारांनी केला. शेलारांनी MVA उमेदवारांच्या मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी सादर करत त्यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर, 'सरकार तुमचे असताना घोटाळे होतात, म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात,' असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. तसेच, निवडणूक आयोगाचा (Election Commission) भोंगळ कारभार उघड करण्यासाठी शेलारांना संयुक्त पत्रकार परिषदेची ऑफरही दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या प्रकरणाला धार्मिक रंग लागल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.