Baramati Accident Special Report: मोबाईलचा नाद, दोन जिवांचा घात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati Accident Special Report: मोबाईलचा नाद, दोन जिवांचा घात आजच्या युगात मोबाईल खूप महत्वाचा आहे.. तरीही कधी मोबाईल वापरावा याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे.. मोबाईलमुळे अपघातांच्या अनेक घटना आपण ऐकल्यात.. अशीच एक घटना घडली बारामतीत... गाडी चालवत मोबाईल वापरणं हे दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलंय.. मोबाईलमुळे बारामती तालुक्यातील जळगाव कडे पठार येथील दोन मुलांचा जीव गेलाय. संस्कार खांडेकर, ओमकार खांडेकर आणि रुपेश खांडेकर ही तीन भावंडं शाळेला निघाली होती.. त्याचवेळी सूर्यकांत धायगुडे आपल्या गाडीतून त्याच मार्गावर प्रवास करत होते. त्यांना फोन आला.. त्यांनी तो कॉल उचलला.. आणि मोबाईल बोलत असताना त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला.. आणि त्यांनी तिघांना धडक उडवलं.. ज्यात दोघांचा जागीच मृत्य़ू झालाय