Aurangabad Fight : औरंगाबाद पंचायत समितीत राडा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भाजप सभापतींना मारहाण
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 03 Aug 2021 05:22 PM (IST)
औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलाच राडा झाला. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना भाजपच्या सोबत जावून पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवलं आणि काँग्रेस कार्यकर्ते खवळले आणि त्यातून त्यांनी उपसभापतींना बेदम मारहाण केली.