परदेशी नोकरीऐवजी धरली शेतीची वाट, 7 एकरवर तरुणानं केली जिरेनियमची शेती, तेलाचा प्लॅंटही उभारला
जयदीप भगत, बारामती
Updated at:
11 Jul 2021 08:01 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक तरुण विदेशी शिक्षणासाठी जातात आणि तिकडेच स्थायिक होतात. परंतु इंदापूर तालुक्यातील अंगद शहा याला अपवाद ठरले आहेत. अंगद शाह हे शिक्षणासाठी परदेशात गेले तिकडेच नोकरीला लागले. मागच्या वर्षी कोरोना काळात भारतात परतले आणि त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. अंगद यांनी 7 एकरावर जिरेनियमची लागवड केली आहे. सोबतच अंगद यांनी जिरेनियम तेलाचा प्लांट उभा केलाय. त्या तेलाला बाजार पेठेत मोठी मागणी आहे.