Ajit Pawar vs Yugendra Pawar:कार्यकर्त्यांचा वादा हवे नवे दादा;बारामतीत काका वि पुतणे?Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामतीत प्रतिष्ठेच्या झालेल्या जागेसाठी नणंद-भावजय मैदानात होत्या. ज्यामध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारली. लोकसभेचं मैदान जिंकल्यावर आता शड्डू ठोकला जातोय तो विधानसभेसाठी. अजित पवार जिथे प्रतिस्पर्धी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करुन जिंकतात त्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी आता त्याच पवार कुटुंबीयांमधलं आणखी एक नाव रणांगणात उतरणार का, अशी चर्चा सुरु झालीय. पाहूयात...
कोण आहेत युगेंद्र पवार?
अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे युगेंद्र पवार चिरंजीव
युगेंद्र पवार विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार म्हणून काम पाहतात
शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये
फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखाना युगेंद्र पवार पाहतात
युगेंद्र बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष
कुस्तीगीर संघाच्या पदावरून युगेंद्र पवार यांना काढल्याची चर्चा
बहिणी विरुद्ध भावजय ला उभा केल्याने श्रीनिवास पवारांच्या कुटुंबांने सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवार कुटुंबातीलच व्यक्ती एकमेकांवर टीका करू लागले. आणि त्यांना निवडून देखील आणलं. परंतु आता ही लढाई वेगळ्या मार्गावरती आहे श्रीनिवास पवारांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं जो शरद पवार जो उमेदवार देतील त्याचा मी प्रचार करेल. आता कार्यकर्त्यांच्या मागणीवरून शरद पवार हे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे