Ahmednagar Special Report : अहमदमगरचं शेख कुटुंब पुन्हा मुस्लिम होण्याच्या तयारीत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAhmednagar Special Report : अहमदमगरचं शेख कुटुंब पुन्हा मुस्लिम होण्याच्या तयारीत
९ नोव्हेंबर २०२३... याच दिवशी अहमदनगरच्या एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला... तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या... मात्र या कुटुंबाने पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात परतण्याचा निर्णय घेतलाय... कारण ठरलंय, त्यांची लहानगी मुलगी... म्हणूनच, असं काय झालंय, की अवघ्या सहा महिन्यांमध्येच या कुटुंबाला हिंदू धर्मातून पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करू वाटतोय... असा प्रश्न सर्वांनाच पडलाय... पाहूयात... याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...
कधी काळी यांचं नाव जमीर शेख होतं... तर त्यांच्या पत्नीचं नाव होतं अंजुम शेख... काही गल्यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर बाबांच्या उपस्थितीत त्यांनी मुस्लिम धर्माचा त्याग करत, हिंदू धर्मात प्रवेश केलाय... हिंदू धर्मावर श्रद्धा असून आम्ही आधीपासूनच हिंदू धर्माच्या पूजा करायचो असं म्हणत त्यांही हिंदू धर्म स्वीकारला... मात्र आता ते पुन्हा हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्मात पुनर्प्रवेश करण्याचा विचार करतायत... त्याचं कारण आहे, त्यांच्या मुलीचं आजारपण... आणि त्याचा खर्च...