Acharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहल्ली कुठेही गेलं की, जीन्स आणि टी-शर्ट घातलेले अनेकजण दिसतात... कॉलेजचे विद्यार्थी म्हटलं की, त्यांच्या अंगात जीन्स आणि टी-शर्ट दिसणार म्हणजे दिसणारच... मात्र, याच जीन्स आणि टी-शर्टवर मुंबईतील एका कॉलेजने बंदी घातलीय... पाहूयात, ते कॉलेज कोणतं आणि नेमकं काय घडलंय?... स्पेशल रिपोर्टमधून...
काय आहे आचार्य मराठे कॉलेजचा आदेश?
विद्यार्थ्यांनी धर्म प्रकट करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारा कोणताही पोशाख घालू नये. नकाब, हिजाब, बुरखा, टोपी, बॅज इत्यादी तळमजल्यावरील कॉमन रूममध्ये जाऊन ते बदलावे (चेंज) करावे लागेल आणि त्यानंतरच ते कॉलेज कॅम्पसमध्ये फिरू शकतील. फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सी परिधान करण्यास कॉलेज परिसरात परवानगी नसेल.
जीन्स, टीशर्टबाबत कॉलेजचं म्हणणं काय?
प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना ड्रेसकोडबाबत
समजावून सांगत आहोत. पोशाखाला रंगाचे बंधन
नाही, मात्र तो सभ्य पद्धतीचा असावा. काही पालकांनी फोन करून या नियमावलीला समर्थन दिलंय.