Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक

Continues below advertisement

Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप (BJP) हा पहिला पक्ष ठरला आहे. महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. आता यावरून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

नरहरी झिरवाळ म्हणाले की,  मी उद्यापर्यंत उपाध्यक्ष आहे. जनतेने मला पुन्हा एकदा संधी दिली. पण राज्यभरातून अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या. महायुती सरकारने अडीच वर्षात अनेक चांगल्या योजना राबवल्या. माणूस सकाळी जेवला की रात्री वेगळ जेवण लागतं, तसं मला ही वाटतं. पाच वर्ष मी विधान भवनात काढले. आता रस्त्याच्या अडून पलीकडे गेलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी मंत्रि‍पदाची इच्छा बोलावून दाखवली. याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, मला आतापर्यंत न मागताच सगळं मिळालं आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास न मागण्यावर सुद्धा आहे. मला न मागता काही न काही मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram