Majha Impact : Reliance नं पीक विम्याचा परतावा दिला, 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार फायदा
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा
Updated at:
04 Dec 2021 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. बरं, ही काही पहिली घटना नाहीय. गेल्या दोन वर्षात राज्यातल्या शेतकऱ्यांनी अनेकवेळा अतिवृष्टी असो की दुष्काळ अशा संकटांना तोंड दिलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविम्याचा आधार घेतला होता. पण, राज्यातल्या 10 जिल्ह्यात एका कंपनीनं पिकविम्याचा परतावा देण्यासाठी नकार दिला. पण, शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलनं केली आणि एबीपी माझानं त्याच आंदोलनाला वाचा फोडली. आता अखेर शेतकऱ्यांना परतावा मिळायला सुरुवात झाली. कोणती आहे ती कंपनी आणि का शेतकऱ्यांना पिकविम्याचा परतावा मिळत नव्हता.