Uddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरे

Continues below advertisement

Uddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरे 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. या सभांमधून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र यावे, असा चर्चा रंगल्या होत्या. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली नाही. तर प्रचार सभांमधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे एकत्र का आले नाहीत? यावर 'एबीपी माझा'च्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत भाष्य केले आहे.  

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. मात्र आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढताना राज ठाकरेंनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यानंतर दोन्ही बंधूंमधील तणाव वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच राज ठाकरेंनी जगातले दुश्मन एकत्र येतात, मग आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवीच. मी आणि उद्धव एकत्र येऊ नये, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र, उद्धव ठाकरेंना भावापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असे वक्तव्य अलीकडेच एका मुलाखतीत केले होते. तसेच मनसेच्या पाठींब्यावर महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे भाकीत राज ठाकरेंनी वर्तवले होते. तसेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी शक्यताही वर्तवली होती. यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram