Aaditya Thackeray on CM Eknath Shinde:रस्ते घोटाळ्यावरुन ठाकरेंनी शिंदे सरकारला घेरलं Special Report
abp majha web team | 09 May 2023 11:18 PM (IST)
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई महापालिकेतल्या कारभारावर त्या काळातल्या विरोधकांकडून म्हणजे भाजपकडून टीका होत होती. पण राज्यातल्या सत्तांतरानंतर सत्ताधारी आणि विरोधकही बदलले. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या कारभारावर होणारे आरोप आणि ते आरोप करणारे नेतेही बदलले आहेत. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचे रस्ते तयार करण्यात येत असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे. आदित्य ठाकरे इतक्यावरच थांबलेले नाहीत, तर त्यांनी आपल्या ब्लॉगमधून काही गंभीर प्रश्नही उपस्थित केलेयत. त्यामुळं मुंबईतल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाखाली भ्रष्टाचाराचं सिमेंट नेमकं कुठं मुरतंय हा प्रश्न उपस्थित होतोय. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.