कहाणी भिरभिरणाऱ्या गोफणीची... गोफण फिरवण्याचीही होते आंतरराष्ट्रीय स्पर्धा, क्रीडा प्रकारातही स्थान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउस्मानाबाद : गोफण हे प्राचीन काळापासून एक सुरक्षेचे साधन म्हणून वापरले जाणारे पण दुर्लक्षित असे साधन. 21 व्या शतकात हीच कला खेळ म्हणून उदयास आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा वेगाने प्रसार होत आहे. या गोफणमुळे शेतकरी आणि त्यांच्या पुत्रांसह इतरांना क्रीडा क्षेत्रात नवे व्यासपीठ निर्माण झाले झाले. स्पेनसह हा खेळ आता 36 देशांमध्ये पोहोचला आहे. अश्मयुगापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे सैन्यही युद्धात गोफणीचा हत्यार म्हणून उपयोग केला. उमाजी नाईक यांनी गोफणीच्या जोरावर इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. ग्रामीण भागातील शेतकरी पिकांचे जंगली प्राण्यांपासून व पक्ष्यापासून रक्षण करण्यासाठी आजही गोफणीचा वापर करतात. आता भारतात अमॅच्युअर स्लिगिंग इंडिया फेडरेशनच्या माध्यमातून गोफण खेळण्याची संधी मिळाली आहे.